रविवारी १९२ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:39+5:302021-02-05T05:17:39+5:30

पुणे : शहरात रविवारी १९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २३८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४ हजार ११५ ...

An increase of 192 corona sufferers on Sunday | रविवारी १९२ कोरोनाबाधितांची वाढ

रविवारी १९२ कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : शहरात रविवारी १९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २३८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ४ हजार ११५ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.६ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या २८७ इतकी आहे़.

शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ९४४ इतकी आहेत. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७६४ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत १० लाख २८ हजार ३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८५ हजार ९२२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७९ हजार २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

==========================

Web Title: An increase of 192 corona sufferers on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.