मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:28+5:302021-02-05T05:17:28+5:30
पुणे : शहरात मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ६९२ ...

मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ
पुणे : शहरात मंगळवारी १७६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ६९२ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६़ ५३ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये १५५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २११ इतकी आहे़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७६८ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही आजमितीला १ हजार ७३५ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ३३ हजार १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९२ हजार १८१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८५ हजार ६७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================