सोमवारी १३५ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:00+5:302021-01-08T04:27:00+5:30
पुणे : शहरात सोमवारी १३५ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. २०२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ९०१ ...

सोमवारी १३५ कोरोनाबाधितांची वाढ
पुणे : शहरात सोमवारी १३५ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. २०२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ९०१ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.६५ टक्के इतकी आहे़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ५५५ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ८३७ इतकी आहेत़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६५२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ३२ हजार १६२ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७९ हजार ७३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७२ हजार २४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़