सोमवारी १२१ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST2021-01-19T04:12:57+5:302021-01-19T04:12:57+5:30

पुणे : शहरात सोमवारी १२१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ...

An increase of 121 corona victims on Monday | सोमवारी १२१ कोरोनाबाधितांची वाढ

सोमवारी १२१ कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : शहरात सोमवारी १२१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ४२ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़ ९२ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०६ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९३ इतकी आहे़

शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार ४६२ इतकी आहेत़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७०९ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ९ लाख ८३ हजार १६४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८३ हजार २९५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७६ हजार १२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़

====================

Web Title: An increase of 121 corona victims on Monday