सोमवारी १०२ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:33+5:302021-02-05T05:17:33+5:30

पुणे : शहरात सोमवारी १०२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २३६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ...

An increase of 102 corona victims on Monday | सोमवारी १०२ कोरोनाबाधितांची वाढ

सोमवारी १०२ कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : शहरात सोमवारी १०२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २३६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ४३१ संशयितांची तपासणी केली. तपासण्याच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.१९ टक्के इतकी आहे़

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये १५६ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. ऑक्सिजनसह उपचार घेणा-यांची संख्या २१० इतकी आहे़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७६६ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ८०८ इतकी आहे़

शहरात आजपर्यंत १० लाख ३० हजार ४३४ जणांची कोरोना तपासणी केली. यापैकी आहे. १ लाख ८६ हजार २४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७९ हजार ४५० जण कोरोनामुक्त झाले आहेत़

Web Title: An increase of 102 corona victims on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.