चुकून जमा झालेले ६८ लाख केले परत
By Admin | Updated: November 16, 2016 05:28 IST2016-11-16T05:28:14+5:302016-11-16T05:28:14+5:30
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून जळगाव येथील एका खासगी कंपनीच्या खात्यात अनावधानाने ६८ लाख रुपये जमा झाले होते.

चुकून जमा झालेले ६८ लाख केले परत
पुणे : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून जळगाव येथील एका खासगी कंपनीच्या खात्यात अनावधानाने ६८ लाख रुपये जमा झाले होते. परंतु कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम व्यास यांनी तत्परतेने या रकमेचा धनादेश पुण्यात येऊन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करीत प्रामाणिकपणाचा एक आदर्श घालून दिला.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने जळगाव गोल्डन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लि. या कंपनीच्या खात्यात ६८ लाख ६६ हजार ६६८ रुपये जमा केले होत़े परंतु, महामंडळाकडून केवळ ९३ हजार रुपये रक्कम येणे अपेक्षित असताना ६८ लाख रुपये जमा झाल्याचे पाहून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम व्यास यांना आश्चर्य वाटले. महामंडळाकडून नजरचुकीने ही रक्कम आली असावी, हे लक्षात आल्यानंतर व्यास हे स्वखर्चाने पुण्यात आले. त्यांनी धनादेश अधिकाऱ्यांकडे जमा केला़ तोपर्यंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नव्हती. (प्रतिनिधी)