शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका प्रशासनाने सुचविलेली मिळकत करातील वाढ स्थायी समितीने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:15 IST

प्रशासनाचा प्रस्ताव बारगळला असून पुणेकरांना मिळकतकर वाढीपासून दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देवाढीमधून महापालिकेला ११० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा प्रशासनाचा होता दावा

पुणे : महापालिका प्रशासनाने सुचविलेली मिळकरामधील बारा टक्क्यांची वाढ स्थायी समितीने फेटाळली आहे. त्यामुळे प्रशासनाचा प्रस्ताव बारगळला असून पुणेकरांना मिळकतकर वाढीपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी प्रतिवर्षासाठी मान्य करण्यात आलेल्या 15 टक्के पाणीपट्टीवाढीचा भार मात्र सोसावा लागणार आहे. स्थायी समितीच्या झालेल्या खास सभेमध्ये मिळक त कराबाबतचा निर्णय घेण्यात आला. मागील चार वर्षांपासून महापालिकेने मिळकतकरामध्ये वाढ केलेली नाही. प्रशासनाने यंदा बारा टक्क्यांची वाढ सुचविली होती. या वाढीमधून महापालिकेला ११० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा प्रशासनाचा दावा होता. पालिकेच्या २०१८-१९ या सालाच्या अंदाजपत्रकामध्ये दीड हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर उत्पन्न वाढीसाठी विविध स्त्रोतांची पडताळणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने मिळकतकर वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले, की महापालिकेच्या विविध खात्यांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मिळकतकर, पाणीपट्टी, आकाशचिन्ह परवाना, मोबाईल टॉवर्स यांची थकबाकी वसूल केल्यास मिळकतकरामध्ये वाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे प्रशासनाला थकबाकीच्या वसुलीबाबत सूचना देण्यात आल्या असून करवाढीस नकार देण्यात आल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले. ====यंदा ठरल्याप्रमाणे २४ तास पाणी पुरवठा योजना १५ टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ २०१७ पासून  केली जात आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च आणि मिळकतकरातून जमा होणारे शुल्क यात मोठी तफावत असल्याने प्रशासनाने २०१९-२० पासून नागरिकांकडून सेवा शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षनेत्यांच्या बैठकीसमोर ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर