शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटींचा मिळकत कर जमा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:01 IST

गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईनमध्ये वाढ : सर्व सवलती १ जूनपासून बंदपहिल्या दोन महिन्यातच तब्बल ५ लाख ३४ हजार ४३४ जणांनी कर जमा केला

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने पहिल्या दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटी रूपये जमा केले आहेत. त्यातील बहुतांशी भरणा हा आॅनलाईन पद्धतीने झाला आहे. आता दोन महिन्यांनंतर कर जमा करण्यासाठी म्हणून जाहीर केलेल्या सर्व सवलती बंद झाल्या असल्याचे या विभागाने कळवले आहे. ८ लाख ७५ हजार मालमत्ताधारकांपैकी पहिल्या दोन महिन्यातच तब्बल ५ लाख ३४ हजार ४३४ जणांनी कर जमा केला आहे. गेल्या काही वर्षात या विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. त्यामुळे त्यांना वारंवार मेसेज पाठवून निरोप देणे त्यांना शक्य होते. त्यातूनच कर वेळेवर जमा करणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. घरबसल्या कर जमा करता यावा यासाठी विशेष संकेतस्थळही या विभागाने सुरू केले आहे. त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी एकूण रकमेपैकी ३५ टक्के रकमेचा भरणा आॅनलाईन पद्धतीने झाला होता. यावर्षी आता पहिल्या दोन महिन्यातच २ लाख ६१ हजार १६५ जणांनी आॅनलाईन पद्धतीने एकूण २५० कोटी ७१ लाख रूपये जमा केले आहेत.यापद्धतीने वेळ वाचतो, शिवाय आॅनलाईन पद्धतीने कर जमा करणाऱ्या करपात्र रकमेवर २ टक्के सवलत मिळते. मात्र, ती रोख स्वरूपात न देता पुढील वर्षीच्या बिलामध्ये दिली जाते. त्यामुळे त्याला वाढता प्रतिसाद मिळतो आहे. त्यातुलनेत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन रोखीने कर जमा करण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. पहिल्या दोन महिन्यांमध्ये एकूण १ लाख ४४ हजार ८८५ जणांनी फक्त ८५ कोटी रूपये जमा केले आहे. धनादेशाने कर जमा करणाऱ्यांची संख्याही फार नाही. १ लाख २८ हजार ४०० जणांनी ३१५ कोटी रूपये जमा केले आहेत. आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांचे प्रमाण आता ३८. ४२ टक्के झाले असून त्या तुलनेत रोख कर जमा करणारे फक्त २७ टक्के आहेत. धनादेशाने भरणा करणाऱ्यांचे प्रमाण २४ टक्के आहे. कॅशलेस इकॉनॉमीत महापालिकेने या विभागाने बरीच मोठी आघाडी घेतली असल्याचे दिसते आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरonlineऑनलाइन