शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत प्रमाणपत्रही होणार आॅनलाइन, खरेदी-विक्री दरम्यानची फसवणूक टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:53 IST

मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग

पुणे : मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेण्यात आला आहे. त्यासाठीची डिजिटायजेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.राज्यातील संगणकीकृत सातबारा उतारे आॅनलाइन उपलब्ध आहेत. ई-फेरफारचे कामही जलदगतीने सुरू आहे. आगामी काळात याच धर्तीवर भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे मिळकत प्रमाणपत्रही आॅनलाइन करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया सुरक्षित होण्यासाठी बायोमेट्रिक नोंदणीची (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकाºयांच्या ‘डिजिटल स्वाक्षरी’, ‘अधिकृत व्यक्ती’ यांची नोंद घेण्यात येणार असून, अधिकृत व्यक्तीने केलेली प्रत्येक कृती आणि बदलाची नोंद मध्यवर्ती सर्व्हरला होणार आहे. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होणार असून, या प्रकरणांचे ट्रॅकिंग होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संगणकीकरण झालेल्या सातबारा, फेरफार, मिळकत प्रमाणपत्र आणि नोंदणी कार्यालयातील दस्त अशा जमीन व्यवहारांशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बनावट व्यवहार रोखणे सोपे होणार आहे. मिळकत प्रमाणपत्राच्या नोंदी करताना एकाच पद्धतीचा वापर न करता काही ठिकाणी मालकाचे नाव, तर काही ठिकाणी आडनाव प्रथम टाकण्यात आले आहे.बनावट व्यवहार वाढलेपुणे शहर आणि जिल्ह्यामधील मालमत्ता आणि जागांचे भाव वाढल्याने बनावट व्यवहारांचे प्रमाणही वाढत चालले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या खरेदी व्यवहाराची माहिती खरेदीदाराने भूमी अभिलेख कार्यालयाला कळविणे आवश्यक आहे.ही माहितीच मिळत नसल्याने मिळकत प्रमाणपत्रावर मूळ मालकाचे नाव कायम राहते. त्यामुळे एकदा विकलेली जमीन पुन्हा पुन्हा विकली जाऊन फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी पडणार आहे.

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन