मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक आणि दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:16+5:302021-02-05T05:15:16+5:30
पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याएवढीच स्थिर आहे. त्यात मागणी देखील स्थिर असल्याने सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर ...

मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक आणि दर स्थिर
पुणे : मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याएवढीच स्थिर आहे. त्यात मागणी देखील स्थिर असल्याने सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. ३१) रोजी सुमारे ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ११ ते १२ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि राजस्थानातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मटार १४ ते १५ ट्रक मध्य प्रदेश आणि गुजरामधून ५ ते ६ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ४० ट्रक इतकी आवक झाली आहे.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १२०० ते १३०० गोणी, कोबी सुमारे ८ ते १० टेम्पो, प्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, भुईमूग शेंगा ५० ते ५५ पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, नवीन कांदा १०० ट्रक तर जुना कांदा २५ ट्रक इतकी आवक झाली.
---
पालेभाज्यांचे दर उतरले
मार्केटयार्डात रविवारी कोथिंबीर, चाकवत, करडई, राजगिरा, चुका, चवळई, पालकच्या दरात घट झाली असून, मेथी, शेपू, मुळे, हरभरागड्डीच्या दरात वाढ झाली आहे. तर कांदापात, पुदीना आणि अंबाडीचे दर मात्र स्थिर होते. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबीरीच्या दीड लाख जुड्यांची मेथीची ८० हजार जुड्यांची तर हरभऱ्याची २० हजार गड्डींची आवक झाली.
कोथींबीरीची जुडीमागे ५ रुपये, चाकवत, राजगिरा,चवळई, आणि पालकच्या जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांची, करडई आणि चुक्याच्या गड्डीमागे प्रत्येकी तीन रुपयांनी घट झाली आहे. मुळ्याच्या दरात जुडीमागे ५ रुपयांनी, मेथी आणि शेपूच्या जुडीमागे प्रत्येकी दोन रुपये आपणि हरभरा गड्डीच्या भावात एक रुपयांनी वाढ झाली आहे़ अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
---
भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर
कांदा २२-२७ ३०-५०
बटाटा ०८-१६ २०-३५
टोमॅटो ०४-०६ १०-१५
भेंडी २५-३० ३०-४०
गवार ३५-४० ४०-५०
मिरची ३५-५५ ४५-६०
कोथिंबीर ०७-१० १०-१५
मेथी ०७-०८ १०-१५
मटार २५-२६ ४०-६०
गाजर १५-१८ २०-२५
---
खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी, बोरांच्या दर वाढ
मार्केट यार्डात रविवारी खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी आणि बोरांच्या दरात झाली आहे. कलिंगडाच्या दरात मात्र घट झाली आहे. तर चिक्कू, अननस, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी आणि लिंबाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री ३५ ते ४० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू ३५० ते ४०० के्रट, चिक्कू २ हजार गोणी, खरबुजाची १० ते १५ टेम्पो, बोरे २०० ते २५० गोणी, स्ट्रॉबेरी १० ते १५ टन, द्राक्षे २० ते २५ टन इतकी आवक झाली.
--
फुलांच्या दरात घसरण
मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडूची आवक घटल्याने फुलांच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर, रविवारी आवक पूर्वपदावर आल्याने दरात घसरण झाली. सुट्टया फुलांसह शोभिवंत फुलांची आवक आणि मागणी कायम असून दरही टिकून आहेत. दरम्यान, येत्या पंधरवड्यात विविध डेंसह व्हेलेंटाईन डे येत आहेत. याकाळात डच गुलाबांच्या मागणीत तसेच भावात वाढ होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.