पालिकेत ३४ गावे समाविष्ट करा
By Admin | Updated: July 2, 2017 03:08 IST2017-07-02T03:08:37+5:302017-07-02T03:08:37+5:30
शासनाने आधी ३४ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करावीत. याबाबत उच्च न्यायालयाने शासनाला वारंवार निर्देश दिलेले आहेत. शासनाची

पालिकेत ३४ गावे समाविष्ट करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धायरी : शासनाने आधी ३४ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करावीत. याबाबत उच्च न्यायालयाने शासनाला वारंवार निर्देश दिलेले आहेत. शासनाची चालढकल अयोग्य आहे; अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी दिला.
महापालिका हद्दीलगतची गावे समाविष्ट करण्याबाबत समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने शासनाला या गावांच्या समावेशाबाबत थेट आदेश देऊनही प्रशासनाची चालढकल सुरू आहे. याबाबत ३४ गावांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत संतप्त भावना आहेत. या गावांत शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यावर बहिष्कार टाकून ग्रामस्थांनी शासनाचा निषेध केला आहे, असे चव्हाण पाटील व समितीचे सचिव बाळासाहेब हगवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बैठकीस सचिव बाळासाहेब हगवणे, राजाभाऊ रायकर, पोपटराव खेडेकर, संदीप तुपे, सुभाष नाणेकर, अमर चिंधे, संतोष ताठे, मिलिंद पोकळे, दिनेश कोंढरे, बंडू खांदवे, शेखर मोरे, संदीप चव्हाण, नितीन चांदेरे, विलास मते उपस्थित होते.