धुमाकूळ घालणा:या सोनसाखळी चोरांना अटक
By Admin | Updated: October 26, 2014 00:11 IST2014-10-26T00:11:57+5:302014-10-26T00:11:57+5:30
पाडव्याच्या दिवशीच शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसकावणा:या सोनसाखळी चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने मोठय़ा शिताफीने पकडले.

धुमाकूळ घालणा:या सोनसाखळी चोरांना अटक
पुणो : पाडव्याच्या दिवशीच शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसकावणा:या सोनसाखळी चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने मोठय़ा शिताफीने पकडले. इमारतीवरून उडय़ा मारून पळून जाणा:या चोरटय़ांचा त्याच पद्धतीने पाठलाग करताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी चोरटय़ांकडून चोरीचा सर्वच्या सर्व माल जसाच्या तसा हस्तगत केला असून, आरोपींकडून 3क् पेक्षा अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मुसा रजा सय्यद इराणी (वय 23, रा. आंबिवली, ठाणो), हैदर अक्रम जाफरी- इराणी (वय 25, रा. नागपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर अली अकबर इराणी (रा. नागपूर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींचा पाठलाग करताना पोलीस कर्मचारी सुजित पवार हे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून या चोरटय़ांनी चोरी करायला सुरुवात केली.
दरम्यान, आरोपींच्या मोटारसायकलच्या क्रमांकावरून शोध सुरू असताना ही गाडी वाघोली येथील तारातरंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने या इमारतीला गराडा घातला. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच आरोपींनी ड्रेनजच्या पाईपला धरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या पाठोपाठ पोलीसही उडय़ा मारून पाठलाग करूलागले. उडी मारल्यानंतर हैदर जखमी झाला. हैदर आणि मुसा या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून 175 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व दागिने मिळून आले आहेत. तसेच मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. आरोपी मूळचे नागपूरचे असून, नागपूर-पुणो -मुंबई असा खासगी बसने प्रवास करीत असत. त्यांच्या खोलीमध्ये नागपूरची शुक्रवारची तीन तिकिटे मिळून आली आहेत.(प्रतिनिधी)
सीसी टीव्ही फुटेजचा आधार
4मार्केट यार्ड येथे सकाळी साडेआठच्या सुमारास एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर चोरटय़ांनी भारती विद्यापीठ, कोथरूड आणि वारजे- माळवाडी येथे महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसकावला. दरम्यान, भारती विद्यापीठ येथील सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. या फुटेजच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न होऊन पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली.
आरोपीवर ससूनमध्ये उपचार
4आरोपींनी वाघोली येथे अरुण अविनाश शेवाळे (वय 21, रा. शिवाजीनगर) याच्या नावाने खोली भाडय़ाने घेतली होती. ही खोली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे घरमालकावर कारवाई करण्यासंदर्भात ग्रामीण पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले. शेवाळे यालाही ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडेही चौकशी सुरूअसल्याचे पवार यांनी सांगितले. हैदर याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरूआहेत.
कसे सापडले चोरटे?
1 अली अकरबर इराणी आणि हैदर अक्रम जाफरी या दोघांनी सकाळी साडेआठच्या सुमारास एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर भारती विद्यापीठ येथील सिक्स्थ सेन्स सोसायटीसमोर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला.
2 भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन सीसी टीव्ही फुटेज मिळवले. या फुटेजमध्ये चोरटय़ांचे छायाचित्र अगदी स्पष्टपणो दिसत होते. हे फुटेज तातडीने पोलीस आयुक्त सतीश माथूरांसह सर्व वरिष्ठ अधिका:यांना पाठवण्यात आले.
3 चव्हाण यांनी कल्याणच्या खब:यांनाही फुटेज पाठवून आरोपींची नावे निष्पन्न केली. दरम्यान, गुन्हे शाखेलाही अरोपींची नावे मिळाली होती. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात आला.
4 भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने फुटेज मिळवून सर्वत्र पाठवल्यामुळे व माहिती वेळेत मिळाल्यामुळे आरोपींना जेरबंद करण्यात यश आले.