शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून घर पेटवले, खामगाव टेक-टळेकरवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 00:56 IST

खामगाव टेक-टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पुनर्वसन जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांत काठी, दगड व कु-हाडीच्या साह्याने झालेल्या मारहाणीत दोन पुरुषांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत.

उरुळी कांचन : खामगाव टेक-टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पुनर्वसन जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांत काठी, दगड व कु-हाडीच्या साह्याने झालेल्या मारहाणीत दोन पुरुषांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. या वादात एका कुटुंबाचे घर व दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून देण्यासह घरासमोरील चारचाकी मोटार फोडण्याचा प्रकार शनिवार दुपारी २ च्या सुमारास घडला. या भांडणात बाहेरून गुंड बोलावून दहशत माजविण्याचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.टिळेकरवाडी-खामगाव टेक (ता. हवेली) येथील गट क्र. ३११ मधील ७० गुंठे जमीन पुनर्वसन बाधित जमीन खरेदी कारणावरून बबन बाबूराव कादबाने व धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर यांच्या कुटुंबात वाद आहे. या जमिनीची खरेदी पुनर्वसिताकडून एका संबंधिताने केली आहे. या जमिनीवरील ताबा बबन कादबाने कुटुंबीयांकडे असल्याने या ताब्यावरून या दोन्ही कुटुंबांत अनेक वर्षांपासू वाद सुरू आहेत. या जमिनीवर कादबाने कुटुंबीयांकडून ऊस पीक घेण्यात आले आहे. या उसाच्या तोडणीचे काम सुरू असताना टिळेकर व कादबाने यांच्यात काल वाद सुरू झाला होता. तो कालच मिटला होता. मात्र, आज पुन्हा या वादाला तोंड फुटले व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. जमिनीचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नातून बबन कादबाने व धर्मेंद्र टिळेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये दुपारी दोनच्या सुमारास वाद झाला. या वादात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुटून पडून दगड, काठी व कुºहाडीच्या साह्याने हल्ला चढवून एकमेकांना जखमी केले आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीच्या हात व पायावर घाव घालण्यात आले आहेत. तर, दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा हल्ला घडल्यानंतर घटनेची खबर मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी रवाना करण्याबरोबर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता अचानक विवाद झालेल्या बबन कादबाने यांच्या घरावर पुन्हा हल्ला चढवून घराचे कुलूप तोडून पेट्रोलच्या साह्याने घरातील दोन खोल्या पेटवून देण्यात आल्या, घरासमोरील दुचाकी पेटवली व कारही फोडली.या घराच्या अंगणात एकटा खेळत असलेल्या चार वर्षांच्या लहान बालकापुढे हा घर पेटविण्याचा प्रकार घडल्याने तो व हे कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. या घटनेत कादबाने कुटुंबीयांची मोठी अर्थिक हानी झाली आहे. दरम्यान, जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी बाहेरून गुंड बोलावून दहशत माजविण्याचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. हा हल्ला घडल्यानंतर चार जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे