येरवडा : पुण्यातील येरवडा परिसरात गाड्या जाळण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.येथील प्रभाग क्र. २मधील चंद्रमा नगरमध्ये एम एच १२ एच एम ८४८९ ही डिस्कव्हर दुचाकी आणि एम एच १२ सीटी २०५१ ही अॅक्टिव्हा अशा २ दुचाकी गाड्या अज्ञात इसमाने रात्री २ वाजण्याच्या सुमारास जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ आणि १८ हजार असे एकूण ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरेश नामदेव धेंडे आणि इसाक महंमद हनिफ शेख यांनी जेल रोड पोलीस चौकीत तक्रारी दिल्या आहेत. पुढील तपास पीएसआय अनिल लोहार करीत आहेत.
पुण्यातील येरवडा परिसरात गाड्या जाळण्याचा प्रकार; नागरिकांची पोलिसांत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 16:41 IST