शिरोली खुर्द येथे युवासेना शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST2021-09-11T04:11:14+5:302021-09-11T04:11:14+5:30

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, युवासेना तालुका युवा अधिकारी विकी पारखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरे आदी ...

Inauguration of Yuvasena branch at Shiroli Khurd | शिरोली खुर्द येथे युवासेना शाखेचे उद्घाटन

शिरोली खुर्द येथे युवासेना शाखेचे उद्घाटन

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, युवासेना तालुका युवा अधिकारी विकी पारखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी युवासेना शाखाप्रमुख म्हणून संकेत ढोमसे यांची नियुक्ती करण्यात आली. तर नीलेश मोरे, सर्वेश ढोमसे, अविनाश सोमोशी यांची उपशाखाप्रमुख आणि स्वप्निल मोरे, सागर मोरे यांची सरचिटणीस, कुणाल सोमोशी, ऋतिक मोरे यांची खजिनदार म्हणून, गणेश थोरात, गणेश सोमोशी, तेजस थोरात यांची प्रभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सल्लागार म्हणून धोंडीभाऊ मोरे, मंगेश सोमोशी, संतोष दामू मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

बबनराव थोरात म्हणाले की, शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षात सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मोठे होण्याची संधी मिळते. शाखेच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी गावातील नागरिकांना मदत करावी. अन्याय झाला असेल तर गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. सूत्रसंचालन शिवसेना शाखाप्रमुख सुरेश ढोमसे यांनी केले. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पापडे, आशा सुनील ढोमसे, माजी उपसरपंच रोहिदास थोरात, उमा ढोमसे, जालिंदर मोरे यांचा सन्मान करण्यात आला.

१० नारायणगाव

युवासेना शाखेचे उद्घाटन बबनराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

100921\img-20210910-wa0211__01.jpg

शिरोली खुर्द येथे युवासेना शाखेचे उदघाटन धुळे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले .

Web Title: Inauguration of Yuvasena branch at Shiroli Khurd