सरपंच परिषदेचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:21+5:302020-12-02T04:11:21+5:30
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे अंतर्गत स्थापित एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने २ ते ४ डिसेंबर दरम्यान दुसऱ्या ...

सरपंच परिषदेचे आज उद्घाटन
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे अंतर्गत स्थापित एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने २ ते ४ डिसेंबर दरम्यान दुसऱ्या राष्ट्रीय सरपंच संसदेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र्रसिंग शेखावत यांच्या हस्ते बुधवारी (दि. २) सरपंच संसदेचे उद्घाटन होणार आहे. तर केंद्रीय रस्ते दळणवळण आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र्रसिंग तोमर समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, इस्त्राईल सहकार संस्थेचे प्रमुख दन अलुफ, महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी सहभागी होणार आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते राहुल कराड हे सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक आहेत.