हडपसर परिसरातील ऋषि आनंदवन चे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST2020-11-26T04:26:12+5:302020-11-26T04:26:12+5:30
पुणे : ऋषि आनंदवन या प्रकल्पाचे स्वप्न साकारण्यासाठी गेली अनेक वर्षे जय आनंद ग्रुपच्या सदस्यांना अनेक संकटे पार करावी ...

हडपसर परिसरातील ऋषि आनंदवन चे उद्घाटन
पुणे : ऋषि आनंदवन या प्रकल्पाचे स्वप्न साकारण्यासाठी गेली अनेक वर्षे जय आनंद ग्रुपच्या सदस्यांना अनेक संकटे पार करावी लागली. मात्र, त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वाला नेल्याचा आनंद आहे. कोण्या संताच्या नावाने एवढा मोठा वृक्ष प्रकल्प महाराष्ट्रात कदाचित एकमेव असावा. त्याचे कौतुक आहेच. मात्र, आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग, नवे पर्याय शोधावे लागतील असे प्रतिपादन उपाध्यायप्रवर प्रवीणऋषिजी म.सा. यांनी केले. हडपसर परिसरातील सातववाडी येथे साकारलेल्या ऋषि आनंदवन या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच झाले.