शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका इमारतीचे उदघाटन आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:11 IST

पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन केले जात असताना बाहेर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना काही काळ अटक करण्यात आली होती. 

 

पुणे : पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन केले जात असताना बाहेर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना काही काळ अटक करण्यात आली होती. 

     आज महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. मात्र त्याआधी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रकाश कदम, योगेश ससाणे, नंदा लोणकर, रत्नप्रभा जगताप यांच्यासह महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि इतर महिला पदाधिकारी नायडू यांच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परवानगीने उभे होते. मात्र अचानक पाऊस सुरु झाल्याने त्यांनी जागा बदलली. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना गाडीत भरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेले आणि काही काहीवेळात सोडून दिले. यावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्याने कारवाई केल्याचे कारण पोलिसांनी दिल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. 

        विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आम्हाला राष्ट्रवादीच्यावतीने उपराष्ट्रपतींचे स्वागत करायचे होते. मात्र पोलिसांनी आम्हाला इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ न थांबू देता दूर हाकलून दिले होते आणि नंतर तर त्याही पुढे जात आमच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. आम्हाला कोणत्याही प्रकारचे आंदोलन करायचे नव्हते. फक्त स्वागत करायचे होते.हा सत्ताधाऱ्यांचा करंटेपणा आहे.महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही निषेध नोंदवला असून महिला पदाधिकाऱ्यांशी चुकीचे वर्तन केल्याचा अनुभव सांगितला. ही अघोषित आणीबाणी असून स्वागत करण्यामुळे अटक केल्याची पहिली घटना असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे या प्रकाराची आम्ही  गंभीर दखल घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसArrestअटक