कोरोनाच्या काळात रखडलेल्या विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:53+5:302021-03-09T04:11:53+5:30

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके, माजी नगरसेवक प्रकाश भुजबळ, सुदाम ...

Inauguration of development work stalled during the Corona period | कोरोनाच्या काळात रखडलेल्या विकासकामांचे उद्घाटन

कोरोनाच्या काळात रखडलेल्या विकासकामांचे उद्घाटन

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके, माजी नगरसेवक प्रकाश भुजबळ, सुदाम शेवकरी, पंचायत समिती सदस्या रुपाली जाधव, माजी नगरसेवक विशाल नायकवाडी, विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कुलच्या कार्यकारी संचालिका रोहिणी देशमुख, उद्योजक श्यामराव देशमुख, योगेश देशमुख, किरण कौटकर, प्रदीप भुजबळ, संभाजी भुजबळ, माजी सरपंच नंदाराम भुजबळ, सुभाष भुजबळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. चाकण नगरपरिषद हद्दीतील मेदनकरवाडी फाटा ते चक्रेश्वर मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, भुजबळ आळीतील बंदिस्त सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार योजना, विशाल गार्डन ते मेदनकरवाडी फाटा ते चक्रेश्वर रस्ता पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकणे तसेच स्ट्रीट लाईट अश्या दोन कोटी रुपयांच्या कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार मोहिते पाटील बोलत होते.

आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, चाकण नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू असून यातील बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत.येणाऱ्या काळात ‘सुंदर चाकण- स्वच्छ चाकण’ अशी मोहीम राबविण्यात येणार असून लोकांना चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सूत्रसंचालन किरण कौंटकर यांनी केले. तर प्रास्ताविक माजी नगरसेवक प्रकाश भुजबळ यांनी मानले.

फोटो - चाकण येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार दिलीप मोहिते पाटील व मान्यवर.

Web Title: Inauguration of development work stalled during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.