खुटबाव येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:34+5:302021-09-02T04:22:34+5:30

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोना मुक्त गाव ...

Inauguration of Corona Control Room at Khutbaw | खुटबाव येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

खुटबाव येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोना मुक्त गाव अभियान या आव्हानाला प्रतिसाद देत खुटबाव गावात पाच प्रकारच्या समित्या तयार करून कोरोना नियंत्रण कक्षचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ज्यांची या समितीमध्ये निवड केली त्यांना ग्रामपंचायतकडून नियुक्तिपत्रक देखील देण्यात आले. भारतीय जैन संघटनेचे कार्य आणि या अभियानविषयी मार्गदर्शन भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन भोगावत आणि दौंड तालुका समन्वयक मयूर सोळसकर यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसेवक जालिंदर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, माजी सरपंच शिवाजीबापू थोरात, सरपंच कलावती चव्हाण, उपसरपंच निखिल थोरात, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष संजय थोरात, तंटामुक्ती अध्यक्ष नानासो थोरात, माजी सरपंच दशरथ थोरात, राजेंद्र थोरात, नवनाथ थोरात, कोंडीबा थोरात आणि ग्रामपंचायत आजी माजी सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

३१ केडगाव कोरोना केंद्र

खुटबाव येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करताना रमेश थोरात व मान्यवर.

Web Title: Inauguration of Corona Control Room at Khutbaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.