नृत्याविष्कारात रंगला उद्घाटन सोहळा
By Admin | Updated: September 6, 2014 00:37 IST2014-09-06T00:37:04+5:302014-09-06T00:37:04+5:30
शास्त्रीय नृत्याची अविट गोडी, लोकनृत्याचे माधुर्य अन् मंचावर उतरलेले तारे.. असा रंजक संगम आज पुणोकरांनी अनुभवला.

नृत्याविष्कारात रंगला उद्घाटन सोहळा
पुणो : शास्त्रीय नृत्याची अविट गोडी, लोकनृत्याचे माधुर्य अन् मंचावर उतरलेले तारे.. असा रंजक संगम आज पुणोकरांनी अनुभवला. ड्रीमगर्लचा दर वर्षीप्रमाणो मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार, शास्त्रीय नृत्याची जोड देत आपल्या अदाकारीने घायल करणा:या तारका जशा मंचावर कलाविष्कार पेश करत होत्या, तसेच काही तारे आपल्या केवळ उपस्थितीनेच वातावरण उजळून टाकत होते. निमित्त होते पुणो फेस्टिव्हलच्या उद्घाटनाचे.
26व्या पुणो फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी झाले. या वेळी सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रजनी पाटील, जितेंद्र, हेमामालिनी, सचिन पिळगावकर, करिष्मा कपूर, इशा देओल, बिंदू, आफताफ शिवदासानी, रझा मुराद हे अभिनेते, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील उपस्थित होते. परंपरेप्रमाणो हेमामालिनी व इशा देओल यांच्या शास्त्रीय नृत्यावर आधारित गणोश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर अभिनेत्री ग्रेसी सिंग हिने राधा-कृष्ण या संकल्पनेवर आधारित विविध चित्रपट गीतांवर लोभस नृत्याविष्कार पेश केला.
भुजबळ म्हणाले, ‘‘पुणो हे सांस्कृतिक शहर म्हणून आपण ओळखतो. परंतु, त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात या महोत्सवाचाही वाटा मोठा आहे.’’ हा 25 वर्षाचा प्रवास सोपा नाही. परंतु, पुढील 25 वर्षे यापेक्षा दुपटीने हा महोत्सव पुढे न्यायला हवा, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. पुणो कायमच सांस्कृतिक राजधानी राहील, असे मत बजाज यांनी व्यक्त केले.
हेमामालिनी म्हणाल्या, ‘‘मी या महोत्सवाचा भाग असल्याचा आनंद आहे. येथे येणो म्हणजे बहुमान व आनंद वाटतो.’’ (प्रतिनिधी)
माझा अभिनयाचा प्रवास गणपती बाप्पापासून झाला आहे. मी महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय चाळीत लहानाचा मोठा झालो. तेथील गणोशोत्सवात फार धमाल करत नाचत. ज्या काळात मी ज्युनिअर कलाकार म्हणून काम करत होतो, त्या वेळी एक पंजाबी मुलगा एवढी चांगली मराठी बोलतो म्हणून शांतारामजींचे माङयाकडे लक्ष गेले आणि त्यांनी मला अभिनेता म्हणून समोर आणले. - जितेंद्र, अभिनेता