महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी इनामदारांचे संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:26+5:302021-02-05T05:02:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्राच्या वतीने वारकरी संतपरंपरेवर आधारित चित्ररथ येत्या २६ जानेवारीला ७२ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथावरील पथसंचलनासाठी ...

Inamdar's music for Maharashtra's Chitraratha | महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी इनामदारांचे संगीत

महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी इनामदारांचे संगीत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्राच्या वतीने वारकरी संतपरंपरेवर आधारित चित्ररथ येत्या २६ जानेवारीला ७२ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. संगीतकार कौशल इनामदार यांनी या चित्ररथाला संगीत दिले आहे. गझल, विठोबाचा गजर अशी सांगड संगीतात घालण्यात आली आहे. संगीताचा कालावधी ५५ सेकंदांचा असून त्यात पखवाज, हलगी, एकतारा यांचा वापर करण्यात आला आहे.

वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. समाजाला विठ्ठलभक्ती शिकवली आहे. हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीसमोर ‘श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शवण्यात आला आहे.

चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या चित्ररथावरील राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या भगवान श्री विठ्ठलाची कटीवर हात असणारी ८.५ फूट उंचीची मूर्ती आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आहेत.

चौकट

“महाराष्ट्राची वारकरी संतपरंपरा यंदा चित्ररथातून प्रतीत होणार आहे. त्यासाठी संगीत देण्याची संधी मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. सांस्कृतिक संचालनालयाशी समन्वय साधत १५ दिवसांत धून तयार झाली. संगीतातून वारीचे चित्र उभे करण्याचे आव्हान होते.”

- कौशल इनामदार, संगीतकार

Web Title: Inamdar's music for Maharashtra's Chitraratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.