इनामदार हॉस्पिटलवर कारवाईस टाळाटाळ
By Admin | Updated: January 24, 2017 02:36 IST2017-01-24T02:36:50+5:302017-01-24T02:36:50+5:30
वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलने बांधलेले पाच बेकायदा मजले पाडण्यावरील स्थगिती राज्याच्या नगरविकास विभागाने उठविल्यानंतरही

इनामदार हॉस्पिटलवर कारवाईस टाळाटाळ
पुणे : वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलने बांधलेले पाच बेकायदा मजले पाडण्यावरील स्थगिती राज्याच्या नगरविकास विभागाने उठविल्यानंतरही महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आला आहे.
इनामदार हॉस्पिटलच्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा देण्याचा प्रस्ताव हॉस्पिटलकडून मांडण्यात आला आहे. मात्र ही जागा घेणे नियमानुसार योग्य ठरणार नसल्याचा अभिप्राय आरोग्य विभागाकडून देण्यात आला. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना त्यावर काहीच कारवाई करण्यात येत नसल्याचे सोमवारी माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रांची पडताळणी केली असता स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी दिली आहे. यादरम्यान त्याविरोधात हॉस्पिटल प्रशासनाकडून नगरविकास विभागाकडून स्थगिती आणली होती. मात्र त्यानंतर ही स्थगिती उठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)