शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:33 IST

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने प्रचाराच्या सभा घेत भाजपवर जोरदार टीका केली होती

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काका-पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. मात्र या एकत्र येण्याचा थेट फायदा शरद पवार गटाला झाला की तोटा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आघाडी करत आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि मनसे स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी लढतीत रंगली होती.अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने प्रचाराच्या सभा घेत भाजपवर जोरदार टीका केली होती. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवत सत्ता दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवारांचे महापालिकेतील सत्तेचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार शरद पवार गटाचा केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.प्रभाग क्रमांक १९ – कोंढवा खुर्द, कौसरबाग निकालया प्रभागात काँग्रेसचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे –तस्लिम हसन शेख (काँग्रेस)आसीया मणियार (काँग्रेस)काशिफ सय्यद (काँग्रेस)गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)या निकालामुळे पुण्यात काका-पुतण्यांची युती असूनही शरद पवार गटाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काळात ही युती कायम राहणार की नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Pawar alliance impact unclear; Sharad Pawar faction gains little.

Web Summary : Pune's local elections saw Pawar factions unite, but Sharad Pawar's group gained minimally. BJP secured victory, dashing Ajit Pawar's ambitions. Congress dominated Kondhwa Khurd, while only one Sharad Pawar candidate won. Future alliance uncertain.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६