शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात देशी गायीला टेस्ट ट्यूब बेबी, प्रथमच झाला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 07:32 IST

होलस्टिन फ्रिजन गाईच्या पोटी देशी साहिवाल

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशी गाईंचे संवर्धन जलद गतीने होण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या स्तरावर प्रथमच पुण्यात गाईंमध्येही टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यातून होलस्टिन फ्रिजन गाईच्या पोटी अधिक दूध देणाऱ्या साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे येथील देशी गाय संशोधन केंद्रात देशी गाईंच्या आयव्हीएफ अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग राबविण्यात आला. या केंद्रात शुक्रवारी  एका होलस्टिन फ्रिजन गाईने सुदृढ देशी साहिवाल कालवडीला जन्म दिला. जन्मत: कालवडीचे वजन २७ किलो आहे. याच केंद्रात गेल्या महिन्यात होलस्टिन फ्रिजन गाईच्याच पोटी गीर जातीच्या कालवडीने जन्म घेतला.

साहिवाल, राठीवरच संशाेधनदेशात गाईंच्या ५० स्थानिक जाती आहेत. त्यापैकी साहिवाल, गीर, राठी, लाल सिंधी व थारपारकर या पाच जातींचे दुधासाठी संगोपन केले जाते. साहिवाल ही जात दिवसातून दोन वेळेला किमान १४ ते १६ लीटर दूध देऊ शकते. राठी ही राजस्थानमधील जात मराठवाडा व विदर्भात चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर या दोन जातींबाबत संशोधन सुरू आहे.

असा आहे प्रयाेगnया तंत्रासाठी शेतकऱ्यांना २० ते २२ हजारांचा खर्च येतो. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य मिळेल. nपहिल्यांदा विणाऱ्या गाईंमध्ये याचा वापर केल्यास यशस्वीतेचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत आहे. जास्त वेत असलेल्या गाईंमध्ये हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे.

गीर ही जात ठरावीक वातावरणातच चांगले दूध देते. साहिवाल ही जात कमी चारा खाऊन, कमी आजारी पडून चांगले दूध उत्पादन देते. त्यामुळेच या जातीच्या संवर्धनासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. यामुळे राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशी वंशावळ असलेल्या स्थानिक वातावरणात चांगले दूध उत्पादन देणाऱ्या गाई उपलब्ध होऊ शकतील.- डॉ. सोमनाथ माने, प्रमुख, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र

देशी गाईंची घटती संख्या पाहता हे तंत्रज्ञान आशेचा किरण आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे.- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :PuneपुणेRahuriराहुरीcowगाय