शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; अन्यथा कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: February 15, 2024 10:24 IST

नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येईल....

पुणे :पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळ्यास कारवाई करण्यात येईल अशीही ताकीद देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी ज्या-ज्या शहरांमध्ये काम केले आहे तेथे दुचाकीस्वाराला हेल्मेट सक्ती केली होती. यामुळे अमितेश कुमार यांना पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर हेल्मेट सक्ती बाबत विचारण्यात आले होते,  त्यावेळी त्यांनी दुचाकीस्वारांनी  हेल्मेट घालणे हे कायद्याने अनिवार्य असल्याने स्वतःहून हेल्मेट परिधान केले पाहिजे असे सांगितले होते.

नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर संबंधित घटकाशी चर्चा करून कारवाईला प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी (ता। १४) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. त्याचवेळी कुठल्याही कामाची सुरुवात स्वतःपासुन करावी आणि लोकांसमोर उदाहरण ठेवावे असे सांगण्यात आले आहे.तर दुसरीकडे शहरात हेल्मेट सक्ती नसल्याचे सांगण्यात येत असले तरीही वाहतूक शाखेकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सुमारे ४ लाखांहून अधिक वाहनचालकांवर विनाहेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३६ कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये पुणे आरटीओ ने खासगी कंपन्यांना नोटीस पाठवून कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी