शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ‘एच३एन२’ने घेतला ज्येष्ठ नागरिकासह महिलेचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 14:24 IST

दोघांना सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले

पुणे : देशभरासह पुण्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या स्वरूपात पसरलेल्या इन्फ्लुएन्झाचा ‘ए’ उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’च्या विषाणूने पुण्यात दोन बळी घेतले आहेत. यामध्ये पुण्यातील एक ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर दुसरी बीडमधील ३७ वर्षीय महिला आहे. गेल्या १३ दिवसांत हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले असून, सोबत दोघांनाही सहव्याधी होत्या. ‘एच३एन२’मुळे पुण्यात प्रथमच दाेन मृत्यू झाले आहेत.

शहरातील कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयात ६७ वर्षीय एच३एन२ बाधित ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू होते. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्याचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बीडच्या ‘एच३एन२ चा संसर्ग झालेल्या ३७ वर्षीय महिलेवर हडपसरच्या नाेबल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते. तर साेबतच ऑटाेइम्युन डिसिज, यकृताचा आजार व मेंदूत रक्तस्राव झालेला हाेता. तिचा २३ मार्च राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.या दाेन्ही रुग्णांच्या मृत्यूचे सखाेल परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची मृत्यू पडताळणी समितीची शुक्रवारी बैठक झाली या बैठकीत तज्ज्ञ डाॅक्टरांनी या दाेन्ही रुग्णांचे उपचार, त्यांच्या मृत्यूचे कारण याचे बारकाईने परीक्षण केले असता दाेघांचाही मृत्यू ‘एच३एन२' ने झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. म्हणजेच सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.

डॉ. नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय सर्वेअलन्स युनिटमधील आराेग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मृत्यू पडताळणी समितीमध्ये सहभाग हाेता. या युनिटमध्ये महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुधीर पाटसुते, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नरेश सोनकवडे आणि डॉ. एच. बी. प्रसाद, डॉ. नायडूतील चेस्ट फिजिशियन डॉ. कार्तिक जोशी आणि नोबल रुग्णालयातील फिजिशियन डॉ. राज कोद्रे, सूर्या सह्याद्री रुग्णालयतील फिजिशियन डॉ. सुजाता गायकवाड आणि डॉ. महेश कुमार यांचा समावेश आहे.

''या दोन्ही रुग्णांना एन्फ्लूएंझा ‘एच३ एन२’' ची लागण झाली होती. यातील एक पुण्यातील, तर दुसरी बीडमधील महिला आहे. ती उपचारासाठी पुण्यात आली हाेती. शिवाय हे दोन्ही रुग्णांना सहव्याधी हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. या विषाणूची बाधा झाल्यावर त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. - डॉ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्यप्रमुख तथा साथरोग विभागप्रमुख, पुणे महापालिका.'' 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्य