शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात युवतीला धमकावून तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:55 IST

पुणे शहरातील पाषाण परिसरातील घटना...

पुणे : मित्रमैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत असलेल्या १६ वर्षांच्या युवतीला लग्नाची मागणी घालून ‘तू माझी नाही झाली, तर कोणाची होऊ देणार नाही,’ असे बोलून तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. औंध भागातील एका २२ वर्षांच्या तरुणीने लग्नास नकार दिल्याने प्रतीक ढमाले याने तिचा खून करून आत्महत्या केली होती. गेल्या महिन्यात ९ नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर, आता हा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी एका १६ वर्षांच्या युवतीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अमोल नवगीरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पाषाण येथील शिवनगरमधील राउंड अ क्लॉक कॅफेमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. त्या हॉटेलमध्ये मैत्रिणीसह वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अमोल हा मित्रांसह तेथे आला. त्याने फिर्यादीचा हात धरून हॉटेलच्या बाहेर चल, तुझ्याशी बोलायचे असून, तिला बाहेर ओढून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. फिर्यादी या हात झटकून बाहेर आल्यावर त्याने फिर्यादीस माझ्याशी लग्न कर, तू माझी नाही झाली, तर कोणाची होऊ देणार नाही, तसेच तोंडावर ॲसिड फेकेन, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरून तिने पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक चाळके तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड