शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

पुण्यात आतापर्यंत १४ आमदारांना ५० हजारांपेक्षा जास्त मतं; अजित पवारांना १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:31 IST

पुणे शहरात आजवर केवळ २०१४ मध्ये तीन उमेदवारांना ५० हजारांचे मताधिक्य मिळाले

नितीन चौधरी 

पुणे : जिल्ह्यात केवळ १११ मतांनी विजयी होण्याचा मान जसा भाजपच्या अण्णा जोशी यांना मिळाला, तसेच सर्वाधिक १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य घेण्याचा विक्रम बारामतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी केला आहे. जिल्ह्यात १९५१ ते २०१९ या काळात ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे १४ आमदार आहेत. त्यात २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ६ आमदारांचा समावेश असून, मोदी लाटेत भाजपच्या चार आमदारांना हे लीड मिळाले होते. तर अजित पवार यांनी आजवर पाच वेळा हा बहुमान पटकावला आहे. या १४ आमदारांमध्ये सहा राष्ट्रवादी, ३ कॉंग्रेस व ५ भाजपचे आहेत. एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य आतापर्यंत दोनदाच मिळाले असून दोन्ही वेळी अजित पवारच भाग्यवान ठरले आहेत.

पहिल्या अन् दुसऱ्या स्थानावर अजित पवारच

जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा बहुमान अजित पवार यांना मिळाला आहे. पवार यांनी २०१९ साली नवा विक्रम करत १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळवली होती. एकूण मतदानाच्या मतांची टक्केवारी तब्बल ८३.२४ टक्के होती. त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत पराभव केला होता. पडळकर यांना केवळ ३० हजार ३७६ अर्थात १२.९२ टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल १ लाख २ हजार ७९७ चे मताधिक्य देखील अजित पवार यांचेच असून, २००९ च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून त्यांनी विक्रम रचला हाेता. त्या वेळी पवार यांनी अपक्ष म्हणून प्रतिस्पर्धी असलेल्या रंजन तावरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत पवार यांना १ लाख २८ हजार ५४४ मते (६८.२६ टक्के) तर तावरे यांना २५ हजार ७४७ (१३.६७ टक्के) मते मिळाली होती. त्यामुळे एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य अजित पवारांना मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे लीड दौंडमधून सुभाष कुल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मिळवले होते. त्यांनी १ लाख २१ हजार ९१४ मते घेत भाजपच्या तानाजी दिवेकर यांचा तब्बल ९२ हजार ६७० मतांनी पराभव केला होता. दिवेकर यांना केवळ २९ हजार २४४ मते मिळाली होती.

अर्धशतकाचा पहिला मान शरद पवारांना

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या लढतीचा विचार करता ५० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांमध्ये पहिला मान शरद पवार यांना मिळाला आहे. त्यांनी १९९० मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी अपक्ष मारुतराव चोपडे यांचा तब्बल ८८ हजार २२३ मतांनी पराभव केला होता. आजवरच्या निवडणुकांत मतदारांची संख्याच कमी असल्याने लाखभर मते कुणालाही मिळाली नव्हती. मात्र, पवार यांना जिल्ह्यात पहिल्यांदाच १ लाखांहून अधिक मते मिळाली होती. त्यांना एकूण १ लाख २ हजार ६६ मते मिळाली होती. पराभूत चोपडे यांना केवळ १३ हजार ८४३ मते मिळाली होती. एकूण झालेल्या मतदानाच्या ८६.८९ टक्के मते शरद पवार यांना, तर चोपडे यांना ११.७८ टक्के मते मिळाली होती. टक्केवारीच्या तुलनेत हा आकडा जिल्ह्यातील एकूण मतदानाच्या सर्वाधिक टक्केवारीचा ठरला आहे.

अजित पवार पाच वेळा मानकरी

जिल्ह्यात ५० हजारांचे लीड मिळालेल्या १४ आमदारांमध्ये अजित पवार यांचा ५ वेळा समावेश आहे. त्यात १९९५, १९९९, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांत त्यांनी हा विक्रम रचला आहे. २०१४ मध्ये अजित पवार यांना ८९ हजार ७९१ मतांचे लीड मिळाले. या वेळी त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर १ लाख ५० हजार ५८८ मते मिळाली. एकूण मतांच्या तुलनेत ही टक्केवारी ६५.९८ इतकी होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या बाळासाहेब गावडे यांना ६० हजार ७९७ अर्थात एकूण मतांच्या २६.६४ टक्के मते मिळाली होती. तर १९९५ मध्ये अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत अपक्ष रतन काकडे यांना ७७ हजार २८१ मतांनी धूळ चारली होती. पवार यांना ९१ हजार ४९३ (७१.९१ टक्के) तर काकडे यांना १४ हजार १५८ (११.१३ टक्के) मते मिळाली होती. १९९९ मध्ये अजित पवार यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार असलेल्या चंद्रराव तावरे यांच्यापेक्षा ५० हजार ३६६ मते अधिक मिळाली होती. पवार यांना ८६ हजार ५०७ तर, तावरे यांना ३६ हजार १४१ मते मिळाली होती.

२०१४ च्या लाटेतही राष्ट्रवादीचे दोघे पुढे

जिल्ह्यात २०१४ ची विधानसभा निवडणूक ६ उमेदवारांना लकी ठरली आहे. मोदीलाटेत भाजपच्या तब्बल ४, तर राष्ट्रवादीच्या २ उमेदवारांना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्यात बारामतीमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार यांचा समावेश असून, आंबेगावमधून राष्ट्रवादीचेच दिलीप वळसे यांना हा बहुमान मिळाला आहे. वळसे यांनी शिवसेनेच्या अरुण गिरे यांचा ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला. वळसे यांना १ लाख २० हजार २३५ (६२.१२ टक्के), तर गिरे यांना ६२ हजार ८१ (३२.०८ टक्के) मते मिळाली होती.

पुणे शहरातून तिघांनाच लाभले भाग्य 

शहरात आजवर केवळ २०१४ मध्ये तीन उमेदवारांना ५० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. तेही भाजपचेच आहेत. त्याला मोदी लाट कारणीभूत आहे. त्यात कोथरूड, पर्वती आणि खडकवासला मतदारसंघांचा समावेश आहे; तसेच पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड मतदारसंघाचा समावेश आहे. कोथरूड मतदारसंघात भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांना ६४ हजार ६६२ मतांनी पराभूत केले होते. कुलकर्णी यांना एकूण १ लाख ९४१ मते (५१.४१ टक्के) मिळाली होती. तर मोकाटे यांना ३६ हजार २७९ मते (१८.३८ टक्के) पडली होती. खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीच्या दिलीप बराटे यांचा ६३ हजार २६ मतांनी पराभव केला होता. तापकीर यांना १ लाख ११ हजार ५३१ (४७.४३ टक्के), तर बराटे यांना ४८ हजार ५०५ (२०.६३ टक्के) मते मिळाली होती. पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांनी सचिन तावरे यांचा पराभव करत ६९ हजार ०९० मते अधिकची मिळवली हाेती. मिसाळ यांना ९५ हजार ५८३, तर तावरे यांना २६ हजार ४९३ मते पडली होती.

पिंपरीतील केवळ दोन आमदारांना ५० हजारांचे लीड

पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी २०१४ मध्येच शिवसेनेच्या राहुल कलाटे यांचा ६० हजार २९७ मतांनी पराभव केला होता. जगताप यांना १ लाख २३ हजार ७८६ मते (४५.४२ टक्के), तर कलाटे यांना ६३ हजार ४८९ मते (२३.२९ टक्के) मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांनी आपले मामेसासरे अपक्ष विलास लांडे यांना ७७ हजार ५६७ मतांनी धोबीपछाड दिली होती. यात लांडगे यांना १ लाख ५९ हजार २९५ (६०.४६ टक्के), तर लांडे यांना ८१ हजार ७२८ मते (३१.०२ टक्के) पडली होती.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाVotingमतदान