शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात PFI च्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा, पोलिसांचे मात्र कानावर हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 11:58 IST

व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा ऐकायला मिळत आहेत..

पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात काल PFI संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. यावेळी काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मात्र अशा घोषणा दिल्या गेल्या नाहीत असं म्हटलं आहे. मात्र व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा ऐकायला मिळत आहेत.

PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED  या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी PFI संघटनेच्या समर्थकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घोषणाबाजीबद्दल पोलिसांनी कोणताही दुजोरा दिला नाही.

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPakistanपाकिस्तान