शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

लोणी काळभोरमध्ये गॅरेज मालकाची दुकानात गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 13:32 IST

ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस....

लोणी काळभोर (पुणे) : येथील पुणे-सोलापूर महामार्गाजवळ लोणी कॉर्नर परिसरात असलेल्या मातोश्री ऑटो गॅरेजच्या २७ वर्षीय तरुण मालकाने स्वतःच्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पवन कांबळे (वय २७, पूर्ण नाव माहिती नाही, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मातोश्री ऑटो गॅरेज नावाने पवन कांबळे यांचे गॅरेज आहे. पवन कांबळे हे सोमवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गॅरेजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी त्वरित ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने पवन कांबळे यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे. पवन कांबळे यांचे मागील एक वर्षापूर्वी विवाह झाला आहे. पवन कांबळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी