शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:29 IST

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

जेजुरी : राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत १३ तारखेला होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

तीर्थक्षेत्र जेजुरीत गुरुवारी ' शासन आपल्या दारी' आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे १ लाख ५७ हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेले आठवडाभर याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे. मुख्य व्यासपीठ आणि त्यासमोर व्हीआयपी कक्ष त्याच्या मागच्या बाजूला लाभार्थ्यासाठी मंडप उभारला जात होता. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास या कक्षाच्या मंडपसाठी लोखंडी पिलर उभारून सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असता हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाड्याखाली कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कार्यक्रमापूर्वीच सांगाडा कोसल्याने भविष्यातील मोठा अनुचित प्रकार टळल्याची चर्चा आहे. रात्रंदिवस मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने कामगारांना अजिबात विश्रांती ही मिळत नाही. रात्री ३ वाजता सांगाडा कोसळल्यानंतर ठेकेदाराने रातोरात सांगाडा उभा करण्यासाठी  कामगारांना कामाला लावले आहे. सकाळपर्यंत कोसळलेला संपूर्ण सांगाडा खोलून पुन्हा उभारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही काम करून झोपायला गेलो असता दहा मिनिटातच सांगाडा कोसळल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. 

दरम्यान, या भव्य सोहळ्यासाठी भव्य मंडप, लाभार्थ्यासाठी वितरण व्यवस्था, मान्यवरांसाठी वातानुकूलित कक्ष, विविध उत्पादसकांसाठी बचतगटांसाठी स्टोल, लाभार्थ्यासाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था फिरती स्वच्छतागृहे आदी सोयी सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार