शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीमध्ये प्रेम संबंधातील जाचामुळे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 13:34 IST

सततच्या जाचाच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या...

जेजुरीओमशिव नारायण वानखेडे या विवाहित तरुणाचे एका महिलेबरोबर प्रेम संबध होते. या महिलेच्या पैशासाठीच्या सततच्या जाचाच्या त्रासाला कंटाळून ओमशिव वानखेडे वय ३० यांनी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव येथे एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफासाच्या सहाय्याने आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओमशिव वानखेडे वय ३० रा. बेटसागवी, ता. लोहा, जि. नांदेड (सध्या राहण्यास चऱ्होली, आळंदी) येथे आई-वडील व पत्नी बरोबर राहत होते. ओमशिव ओला कार चालवून उदरनिर्वाह करत होता. ओमशिव याचे दुर्गा सागर राठोड या विवाहित महिलेशी अनेक दिवसांपासून प्रेमसंबध होते.

या प्रेमसंबधाची माहिती दोन्ही कुटुंबियांना होती. सदर दुर्गा राठोड सतत ओमशिव याच्याकडे पैशाची मागणी करीत असल्याने दोघांच्यात सतत भांडणे होत होती. दि. १ रोजी ओमशिव यांची पत्नी मनीषा वानखेडे यांना ओमशिव यांच्या मोबाईलवरून दुर्गा राठोड यांच्या आई व बहिणीने फोन करून तुझ्या नवऱ्याने दुर्गा हिला विष पाजून तो पळून गेला आहे. दुर्गाला काही झाले तर त्याला सोडणार नाही असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी दि. २ रोजी मनीषा वानखेडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ओमशिव वानखेडे याने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती दिली. मनीषा वानखेडे यांनी याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दुर्गा राठोड हिच्या पैशासाठीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून दुर्गा राठोडच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीJejuriजेजुरी