शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत नॉयलॉन मांजा गळ्याला कापल्याने एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:12 IST

संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी...

बारामती: शहरात नायलॉन मांजा गळ्याला कापल्याने एकास गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बारामती शहरात गेल्या आठवडाभरापासून शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री विरोधात कडक कारवाईची मोहिम राबविली. या कारवाईत चार जणांवर कारवाई करीत जवळपास ४० हजार रुपयांचा नायलॉन मांजा देखील जप्त केला. नायलॉन मांजा वापरुन पतंग उडविल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, नागपंचमी सण उलटून चार दिवस उलटले  तरी अद्याप नायलॉन मांजाचा छुप्या पध्दतीने वापर सुरुच असल्याचे शुक्रवारी घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.

नितीन काका वणवे असे नायलॉन मांजा कापून जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. वणवे हे शुक्रवारी सायंकाळी आपले काम आटोपून दुचाकीवरुन घरी निघाले होते. यावेळी इंदापूर रस्त्याच्या मागील बाजूने ते निघाले असताना त्यांच्या गळ्याला नॉयलॉन मांजा कापला. तो मांजा धारदार असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. काही वेळातच त्यांना रक्तस्त्राव सुरु झाला. तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करीत रक्तस्त्राव थांबविला. यात वणवे यांच्या गळ्याला जवळपास २६ टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली नाही किंवा मुख्य नसांना धक्का लागला नाही.

याबाबत डॉ संजय पुरंदरे यांनी सांगितले की, नितीन वणवे यांना आतील व बाहेरील मिळून २६ टाके त्यांना टाकावे लागले. एखाद्याच्या जीवाशी आपण खेळतो आहोत याचे भान नॉयलॉन मांजा वापरणा-यांनी ठेवायला हवे. त्यांचे नशिब चांगले होते म्हणून स्वरयंत्र, तसेच इतर गंभीर दुखापत झाली नाही.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती