महत्त्वाची बातमी! लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे 15 दिवस राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:42 PM2021-10-05T18:42:50+5:302021-10-05T18:44:34+5:30

पुणे : 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस पुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे बंद राहणार आहेत. विमानतळाच्या धावपट्टीच्या कामासाठी उड्डाणे बंद ...

Important news for Punekars! Flights at Lohgaon Airport will be closed for 15 days | महत्त्वाची बातमी! लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे 15 दिवस राहणार बंद

महत्त्वाची बातमी! लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे 15 दिवस राहणार बंद

googlenewsNext

पुणे: 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस पुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे बंद राहणार आहेत. विमानतळाच्या धावपट्टीच्या कामासाठी उड्डाणे बंद राहणार आहेत. हवाई दलाकडून सप्टेंबर 2020 मध्ये विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे त्यामूळे 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

लोहगाव विमानतळ बंद राहण्याची घोषणा प्रशासनाने फक्त 10 दिवस अगोदर सांगितल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. या निर्णयाचा फटका 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिजर्वेशन केलेल्या प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात रात्रीची उड्डणे बंद केल्याने हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिजर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे.

Web Title: Important news for Punekars! Flights at Lohgaon Airport will be closed for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.