शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटसृष्टीत प्रामाणिकतेला महत्त्व : गिरीश ओक; महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा पुण्यात वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:49 IST

मी चित्रपटसृष्टी या व्यवसायात आहे. या व्यवसायात तुम्ही काम कसे करता, किती प्रामाणिक, किती चोखपणे करता हेच बघितले जाते,’’ असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या ९२व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याई सभागृह येथे कार्यक्रमब्राह्मण ब्राह्मणांचे पाय का खेचतात? : डॉ. गिरीश ओक

पुणे : ‘‘मी चित्रपटसृष्टी या व्यवसायात आहे. या व्यवसायात ब्राह्मण, जातपात, धर्म हे काहीच बघितले जात नाही. तिथे फक्त तुमचा दिलेला शब्द, दिलेली वेळ, तुमचे कष्ट, तुम्ही काम कसे करता, किती प्रामाणिक, किती चोखपणे करता हेच बघितले जाते,’’ असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले.महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या ९२व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याई सभागृह, कोथरूड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संगीतकार प्रभाकर जोग अध्यक्षस्थानी होते. या वेळी सुरेश धर्मावत, गिरीश काळे, प्रकाश दाते, अतुल व्यास  डॉ. दिलीप पटवर्धन, संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भालचंद्र कुलकर्णी, शिरीष काळे, नानासाहेब (रघुराज) तुळशीबागवाले, भगवंतराव कुलकर्णी, विश्वास पटवर्धन, अभिजित अग्निहोत्री, संस्थेच्या अध्यक्षा, सुनीती दाते आदी उपस्थित होते.  संस्थेविषयी सांगायचे म्हणजे ९२ वर्षे जुनी ब्राह्मण सभा ही संस्था आहे. एवढ्या वर्षांपासून जर ही संस्था समाजकार्य करते आहे, तर मग माणूस किती जुना आहे आणि तो केव्हापासून तयार झाला आणि तेव्हापासून तो काय-काय करीत आला आहे, याचाही आपण विचार करायला हवा, असेही ओक म्हणाले.  केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश दाते यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा कुलकर्णी यांनी ईशस्तवन सादर केले. अतुल व्यास यांनी आभार मानले.

डॉ. ओक म्हणाले, ‘‘ब्राह्मण, ब्राह्मण समाज, जात या गोष्टींपासून आमच्या वडिलांनी आम्हाला नेहमी लांब ठेवले. व्हॉट्स अ‍ॅपवर एकदा आले, की पटेल लोक एकमेकांना कसे मदत करतात; तर मग ब्राह्मण ब्राह्मणांचे पाय का खेचतात?’ असा प्रश्न मला पडायचा. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आज बिझनेसच्या संदर्भात बरेच ग्रुप तयार झालेले आहे. त्यामध्ये तरुण ब्राह्मण पिढीचा जास्त समावेश दिसून येतो. ही चांगली गोष्ट आहे.’’ 

पुरस्कार प्रदान कार्यक्रमात अशोक देशमाने  (स्नेहवन) यांना सामाजिक पुरस्कार  देण्यात आला. सानिका नादगौडा (रोप मल्लखांब) यांना खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, उद्योजक पुरस्कार निरुता किल्लेदार (असीम फाउंडेशन) यांना देण्यात आला.

टॅग्स :Girish oakगिरिश ओकPuneपुणे