शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा "झिरो पेंडन्सी"ची अंमलबजावणी : डाॅ.राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 19:33 IST

पुढील दोन महिन्यांत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश

ठळक मुद्देनवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचा पाच दिवसांत नऊ तालुक्यांचा दौरा

पुणे : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बहुतेक सर्व महसुली कामे ठप्प आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना सोबतच महसुली कामे मार्गी लावण्यासाठी नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय अधिकारी , तहसीलदार सर्व ठिकाणी "झिरो पेडन्सी " उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये देशमुख यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन पुढील दोन महिन्यांत सर्व प्रलंबित प्रकरणे, अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत . 

पुणे जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.त्यानंतर शासनाने लाॅकडाऊन जाहिर केले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गावपातळीवरील तलाठी ते जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महसूल कर्मचारी कोरोनाच्या कामामध्ये व्यस्त आहेत. यामुळे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बहुतेक सर्व महसुली काम ठप्प आहेत. याबाबत देशमुख यांनी सांगितले की, आता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसिलदार कार्यालय सर्व ठिकाणी झिरो पेशन्सी आणि डेली डिस्पोजेबल सिस्टीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन येत्या दोन महिन्यांत सर्व प्रलंबित अर्ज व प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता कोरोना सोबतच इतर विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे देखील मार्गी लागतील असा विश्वास देखील देशमुख यांनी व्यक्त केला. ------पाच दिवसांत नऊ तालुक्यांचा दौरापुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच झपाटून कामाला लागले आहेत. तेही केवळ ऑफीसमध्ये बसून नाही तर ऑन फिल्डवर जाऊन सर्व यंत्रणेला कामाला लावले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत देशमुख यांनी कोरोनाची ग्राऊंडवर वस्तुस्थिती काय आहे हेे पाहण्यासाठी बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड , मावळ आणि मुळशी या तालुक्यांचा दौरा केला. यामध्ये प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयासह अधिग्रहीत केलेल्या खाजगी हाॅस्पिटलला देखील भेट दिली. औषधांचा पुरवठा व्यवस्थित होतोय का, रुग्णांना मिळणारे जेवण, रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या , रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवणे आवश्यक असल्याने त्यात वाढ केली, प्रत्यक्ष रुग्णांसोबत चर्चा केली.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीdigitalडिजिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस