देवाची सावली उपक्रम राबवा : महेश भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:10 IST2021-05-18T04:10:01+5:302021-05-18T04:10:01+5:30
भागवत म्हणाले की, देवाची सावली या अंतर्गत असा उपक्रम राबविता येऊ शकेल. भारतामध्ये सध्या प्रतिमाणसी २८ झाडे आहेत. हे ...

देवाची सावली उपक्रम राबवा : महेश भागवत
भागवत म्हणाले की, देवाची सावली या अंतर्गत असा उपक्रम राबविता येऊ शकेल. भारतामध्ये सध्या प्रतिमाणसी २८ झाडे आहेत. हे प्रमाण वाढले पाहिले. त्यासाठी झाडांची लागवड जास्तीतजास्त करणे गजरेचे आहे. त्यासाठी शिर्डी येथील साईबाबा मंदिर, तुळजापूरची आई तुळजाभवानी, पंढरपूरचा पांडुरंग, वणीची सप्तशृंगी, जेजुरीचा खंडोबा ही प्रख्यात देवस्थाने आहेत. सध्या ही देवस्थाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. परंतु भविष्यात ही देवस्थाने उघडल्यानंतर देवस्थानच्या माध्यमातून सरकारने येणाऱ्या भाविकाला त्या त्या देवाचा चरण स्पर्श करून एक झाड भेट दिले पाहिजे. त्यासाठी शासनाने देवस्थानच्या मार्फत पाच कोटी झाडे पुरवल्यास महाराष्ट्रामध्ये आपोआप झाडांची संख्या वाढलेली दिसेल. या वेळी भीमा पाटसचे उपाध्यक्ष आनंद थोरात म्हणाले की, देवाची सावली हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाद्वारे आपण संपूर्ण भारतभर देशी व औषधी कोट्यवधी झाडांचे संवर्धन करू शकतो. श्रद्धेचा व भावनेचा विषय असलेले भाविक ही झाडे जगवू शकतात.