तरूणाईचा प्रभाव

By Admin | Updated: August 7, 2015 00:49 IST2015-08-07T00:49:49+5:302015-08-07T00:49:49+5:30

बारामती तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीपैकी निरावागज ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित ४४ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या

Impact of youth | तरूणाईचा प्रभाव

तरूणाईचा प्रभाव

महेंद्र कांबळे , बारामती
बारामती तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीपैकी निरावागज ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित ४४ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक पातळीवरील पुढाऱ्यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. त्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी पॅनलच्या विरोधात कौल दिला. या निवडणुकीत तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या ज्येष्ठ पुढाऱ्यांच्या पॅनलला झटका दिला आहे.
विशेष म्हणजे मेखळी ग्रामपंचायतीसह अनेक ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये खंडोबाचीवाडी ४, वढाणे २, झारगडवाडी २, सोनगाव २, मेखळी ५, ढेकळवाडी ३, पिंपळी ४ या २२ जागांवर रासपचे उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी दिली. तर शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांच्या नेतृत्वाखालील निंबूत या मोठ्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. त्याच बरोबर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलच्या ताब्यातून खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीची सत्ता काकडे गटाच्या नेतृत्वाखालील पॅनलने मिळविली आहे. त्यांना रासपच्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली.
खांडज ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने सत्ता मिळविली. तरी देखील ५ जागांवर शेतकरी कृती समितीने विजय मिळविला.
माळेगाव कारखान्याचे संचालक रामदास आटोळे, सिताराम आटोळे, प्रकाश सोरटे, बाळासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनल लढला. तर राष्ट्रवादी पुरस्कृत खंडेश्वरी जयभवानी पॅनलने ८ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळविले. प्रताप आटोळे, माऊली आटोळे, नितिन आटोळे, उत्तम फाळके, अनिल सोरटे या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी एकत्रित निवडणूक लढविली.
मेखळी ग्रामपंचायतीमध्ये दिग्गज पुढाऱ्यांच्या पॅनल विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पॅनलने लढत दिली. चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला ६ जागा मिळाल्या. दूध संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव देवकाते, डॉ. पेमेंद्र देवकाते यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल आहे. तर रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, संचालक विलास देवकाते यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीमध्ये पक्ष चिन्हावर सर्व जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये ५ जागा रासपला मिळाल्या आहेत. सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. रासपाचा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शिरकाव महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या गावपातळीवरील पॅनलमध्येच निवडणुका होत. विशेषत: राष्ट्रीय समाज पक्षाने मेखळी ग्रामपंचायतीमध्ये सर्व जागा लढविल्या. तर अन्य ठिकाणी त्यांच्या ताकतीप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले. साधारणत: तालुक्यात ३० ते ३५ जागांवर रासपचे उमेदवार पक्ष चिन्हावर निवडून आले आहेत, असा दावा जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी केला आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निंबूत, खंडोबाचीवाडीत काकडे गटाने सत्ता मिळविल्याने स्थानिक राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना झटका बसला आहे. वडगाव निंबाळकर या मोठ्या ग्रामपंचायतीचे सुत्रे संग्रामराजे निंबाळकर यांच्याकडे आले आहेत. या ग्रामपंचायतीत सत्ताधारी पॅनलला पराभव स्वीकारला लागला आहे. संग्रामराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला १० जागा मिळाल्या. १ जागा अपक्ष (परिवर्तन पॅनल) मिळाली. तर माजी उपसभापती अविनाश शिंदे, विद्यमान सरपंच धैर्यशील राजेनिंबाळकर, माजी सरपंच सुनिल ढोले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ६ जागा मिळाल्या. कोऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे यांच्या पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनिल भगत यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ जागा जिंकून पुन्हा सत्ता मिळविली. कोऱ्हाळे ग्रामपंचायतीची सत्ता गेलेली असताना जवळच्या थोपटेवाडी ग्रामपंचायतीवर सतीश खोमणे यांच्या पॅनलने सत्ता मिळविली. त्यांच्या नेतृत्वखालील पॅनलने ५ जागा जिंकल्या. ४ जागा विरोधी पॅनलला मिळाल्या.

कारखेल : भाऊसो बापूराव चव्हाण - ३२५ शरद तुकाराम वाबळे - ३१३ अश्विनी दिपक भोसले - ३०० अशोक शंकर शिंदे - २५५ सविता कल्याण भापकर - ३१० वंदना हनुमंत भोसले - २२६ पल्लवी हिरामन लोंढे - २८० मंगल सुरेश वनकुद्रे - २७० कांतीलाल आनंदराव भापकर - २९०.
बऱ्हाणपूर : योगेश अशोक जाधव - २४६ वनिता दिलीप गवळी - २५४ अंकुश तात्याबा चांदगुडे - २५० संगिता बाळासाहेब जगताप - (बिनविरोध) मिरा महेश चांदगुडे (बिनविरोध) लता फत्तेसिंग दरेकर - २०६ अनिता विठ्ठल मोरे - (बिनविरोध) अलका पोपट भंडलकर - (बिनविरोध).
होळ : शुभांगी भाऊ साळवे - १६७ बच्चन मनोहर आटोळे - १५१ सुलोचना राजेंद्र होळकर - ३७८ बाबासो भाऊसो होळकर - ४१३ राजश्री रोहिदास वायाळ - ३९१ मानसिंग बाबा भिसे - ३१६ छाया उत्तम भंडलकर - ३६२ वैभव साहेबराव होळकर - ३७५ संतोष परशुराम होळकर - ३४१ हेमा हनुमंत वायाळ - ३१६ स्नेहा सिद्धार्थ गिते - (बिनविरोध)
वाकी : आप्पासाहेब किसन भंडलकर - (बिनविरोध) सुनंदा रमेश सोनवणे - १७३ अनिता नवनाथ गाडेकर - २२२ शंकर मार्तंड जगताप - २०९ हनुमंत ज्ञानदेव ननवरे - १९५ साधना अरविंद गायकवाड - १९८ संभाजी पोपट जगताप - २१३ शोभा भारत कुंभार - १९६ कमल राजेंद्र भापकर - २१६
बाबुर्डी : नितिन दिनकर लडकत - (बिनविरोध) सुजाता सुरेश गायकवाड = (बिनविरोध) अंजन अंकुश लडकत - (बिनविरोध) नारायण बबन ढोपरे - (बिनविरोध) सविता सुरेश गायकवाड - ३६२अनिता वाल्मिक जगताप - २९० दिलीप महादेव पोमणे - (बिनविरोध) शुभांगी हनुमंत लव्हे - (बिनविरोध) मंगल बाळासाहेब पोमणे - (बिनविरोध)
मुर्टी : १) पूनम संजय खोमणे - २७५ प्रभाग ४ मधून निवडून आले.
माळवाडी लाटे : शेवानंद नानासो खलाटे - १२९ विद्या राजेंद्र बेलके - १३४ आनंदराव बाबुराव खांडेकर - १६३ मनिषा सोमनाथ नाळे - १६६ रणजित अंकुश नाळे - २०९ अरुणाबाई छिद्रराम गुळमे - २१३ रेश्मा सुनिल दानवले- २११
लाटे : शर्किरा लतिफ पठाण - २६८ सुनिल सुधाकर निंबाळकर - २७६ रेणुका महेंद्र खलाटे - २९६ खंडेराव विठ्ठल इंगळे - ३०८ सुनिल वामन मदने - २८४ नंदा हरिभाऊ साबळे - ३२७ मिनाक्षी सच्छिनंद माने - ३२६ अनिल रामचंद्र वाघमारे - ३२३ मंगल सुधाकर खलाटे - ३३१

Web Title: Impact of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.