शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीच्या कामावर परिणाम

By नितीन चौधरी | Updated: February 28, 2024 17:21 IST

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी

पुणे : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. २७) मध्यरात्रीपासून दोन दिवस तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कामगारांच्या संयुक्त कृती समितीसोबत कामगार आयुक्त व तिन्ही कंपन्यांची बैठक निष्फळ ठरल्यामुळे हे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. महावितरणच्यापुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा महावितरणच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफरशींची तातडीने अंमलबजावणी करा, कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्या, अशा या कामगारांच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी कामगार आयुक्त, तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर कामगारांनी संपावर जाण्याचा निर्धार केला. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सध्या ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यातील महावितरणच्या पुणे परिमंडलातील १ हजार ४५० कामगारांचा समावेश आहे. तर महापारेषणमधील ८० कामगार सहभागी आहेत.

या संपामुळे महानिर्मितीतील ८० टक्के कामगार संपावर गेल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. महावितरणच्या वीजबिल वसुलीवर परिणाम झाला आहे. – नीलेश खरात, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजagitationआंदोलनEmployeeकर्मचारी