नोटा बदलाच्या बहाण्याने अपहार
By Admin | Updated: January 14, 2017 02:51 IST2017-01-14T02:51:26+5:302017-01-14T02:51:26+5:30
जुन्या नोटा बदलून देण्याची बतावणी करून दोघांनी २५ लाखांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी

नोटा बदलाच्या बहाण्याने अपहार
पिंपरी : जुन्या नोटा बदलून देण्याची बतावणी करून दोघांनी २५ लाखांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रवींद्र सोनवणे (रा. हडपसर) आणि मुकेश बाविस्कर
(रा. चोपडा, जळगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत पवार (वय ४५, रा. वानवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत पवार हे सरकारी ठेकेदार आहेत. तर, रवींद्र आणि मुकेश मेहुणे आहेत. सोनवणे हा पूर्वी वानवडी परिसरातील एका पतसंस्थेत नोकरी करत होता. त्या वेळी त्यांची ओळख झाली होती. दरम्यान, पवार यांच्याकडे मशनरीच्या भाड्याचे सहा लाख, मित्रांकडून उसने घेतलेले दहा लाख, कामगारांचे पगार आणि लग्न कार्यासाठी पत्नीच्या बँक खात्यातून काढलेले नऊ लाख अशा जुन्या नोटातील पंचवीस लाख रुपयांची रोकड होती. ही रक्कम पवार यांना बँकेत भरायची होती. (प्रतिनिधी)