पुणे : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला माल व प्रवासी वाहतुक संघटनांही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ८) शहरातील माल वाहतूक बंद राहणार आहे. तसेच विविध पक्ष व संघटनांकडून काढण्यात येणाºया मोर्चाच्या कालावधीत रिक्षा वाहतुकही बंद राहणार आहे. एसटी व पीएमपी वाहतुक नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ॲाल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे देशभरात कोट्यावधी सदस्य आहेत. त्यामुळे देशभरातील खासगी माल व प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. पुण्यातील वाहतुकही बंद राहणार असल्याचे या संस्थेचे सदस्य व महाराष्ट्र माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. विविध रिक्षा संघटनांनाही बंदला पाठिंबा दिला आहे. बंद दरम्यान शहरात लोकमान्य टिळक चौक ते महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ््यापर्यंत विविध पक्ष व संघटनांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. मोर्चा संपेपर्यंतच्या कालावधीत रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले.
दरम्यान, बस आॅपरेटर कान्फडरेशन आॅफ इंडिया (बोकी) चे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांनी बंदला पाठिंबा असला तरी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवासी वाहतुक सुरू राहणार असल्याचे सांगितले. प्रवाशांनी आधीच आरक्षण केलेले असल्याने ही वाहतुक बंद ठेवता येणार नाही, असे ते म्हणाले. एसटी व पीएमपीची बस वाहतुकही नियमितपुणे सुरू राहणार असली तरी बंददरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांच्या सुचनेनुसार वाहतुक बंद ठेवली जाईल, असे अधिकाºयांनी सांगितले.
------------