कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन

By Admin | Updated: September 29, 2015 02:18 IST2015-09-29T02:18:25+5:302015-09-29T02:18:25+5:30

अखिल तांदुळवाडीवेस तरुण मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराजांचे अभंग, ओव्या व पर्यावरणाचा संदेश देत जनहित प्रतिष्ठान शाळेचे ढोल व लेझीम पथक

Immersion tapes in artificial ponds | कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन

कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन

झाडे लावा, झाडे जगवा’चा पर्यावरणजागृतीचा संदेश देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुलालविरहित गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. बारामती शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत ९३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली. कारवाईच्या इशाऱ्यामुळे शहरात यंदादेखील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर केला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री साडेअकरापर्यंत सुरू होत्या. यंदा नीरा डाव्या कालव्यात पाणी नसल्याने प्रथमच कृ त्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यात आले.
बारामती : अखिल तांदुळवाडीवेस तरुण मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराजांचे अभंग, ओव्या व पर्यावरणाचा संदेश देत जनहित प्रतिष्ठान शाळेचे ढोल व लेझीम पथक, पर्यावरण पथक आदी सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील भागवत, उपाध्यक्ष श्रीकांत गायकवाड, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, सचिव अमोल बोधे, नगरसेवक, श्याम इंगळे, नारायण सिकची, किरण इंगळे, जयसिंग पवार, राजेश मेहता, रमेश पंजाबी, अरुणदादा नलवडे, राजेश जाधव, सचिन पवार उपस्थित होते. फुलांच्या पाकळ््यांचा वापर करण्यात आला.
कसबा येथील काशीविश्वेश्वर तरुण मंडळाचा साध्या पद्धतीने गणपती विसर्जन सोहळा पार पडला. एक तास चाललेल्या मिरवणुकीत धों. आ. सातव शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचा समावेश होता. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, सचिन सातव, सूरज सातव, दत्तात्रय सातव आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलची विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सनई चौघड्याने या मिरवणुकीची सुरुवात झाली. या मंडळाची पालखीत गणपती ठेवून काढलेली मिरवणूक, तसेच मिरवणुकीतील मर्दानी खेळ, ढोल-लेझीम पथक, उंट, घोड्यांचा सहभाग नागरिकांच्या कौतुकाचा विषय होता.
अध्यक्ष किरण गुजर, उपाध्यक्ष प्रदीप परकाळे, सचिव अ‍ॅड. अमर महाडिक या वेळी उपस्थित होते. मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक बाह्य मार्गाने वळवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० पोलीस अधिकारी, २९० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. शहरात खंडोबानगर, कसबा, मोतीबाग चौक, भिगवण रस्ता या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक संघ, तीन हत्ती चौक, दत्त मंदिर, तुपे बंगला, परकाळे बंगला, गरुडबाग, माळावरची देवी मंदिर या ठिकाणी जलकुंभ ठेवण्यात आले होते.
मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आरत्या होत्या. तसेच, नगरपालिकेच्या वतीने गांधी चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. प्रांताधिकारी संतोष जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, नगरसेविका यास्मीन बागवान, नगरसेवक सुभाष ढोले, सुनील सस्ते, मुख्य अधिकारी नीलेश देशमुख, नगरपालिकेचे खातेप्रमुख, कर्मचारी, नगरसेवक, नगरसेविका आदींनी येणाऱ्या गणेश मंडळांचे स्वागत केले.
शहरातील मानाचा पहिला गणपती अखिल मंडई मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, जय जवान गणेशोत्सव मंडळ, अखिल महावीर पथ मंडळ, जय जवान तरुण मंडळ, आझाद तरुण गणपती मंडळ, मारवाडपेठ तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ, नवरत्न तरुण मंडळ, नटराज तरुण मंडळ, एसटी कामगार संघटना गणेश मंडळ, श्रीराम गणेशोत्सव तरुण मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, सन्मित्र तरुण मंडळ आदी मंडळांनी साधेपणाने गणेश विसर्जन केले.

Web Title: Immersion tapes in artificial ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.