शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 20:01 IST

मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

पुणेफुलांची आकर्षक सजावट असलेल्या आणि कोल्ड फायरची विद्युत रोषणाई करणार्‍या पारंपरिक अशा मयूरपंख रथात विराजमान होऊन हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दिमाखदार मिरवणुकीने शुक्रवारी पहाटे विसर्जन झाले.

प्रथा परंपरेनुसार गुरूवारी सकाळी  महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या  पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींंना 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. 132 वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत असलेल्या रथाला आकर्षक असे मयुरपंख बसवून तो सजविण्यात आला होता. त्यावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या मयुरपंख रथात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती ठेवण्यात  आली होती.

ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. रात्री बारा वाजता टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. स्वत: पुनीत बालन यांनी या रथाचे सारथ्य केले होते. बेलबाग चौकात मयुररथ आल्यानंतर सहपोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली. विसर्जन मिरवणुकीत या रथापुढे शिवाजीराजे मर्दानी पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर समर्थ, रमणबाग आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला.

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी होणारी फुलांची उधळण, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. सकाळी सहा वाजता टिळक चौकात मयूररथ आल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी सव्वा सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

"दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. कमीत कमी वेळेत ही मिरवणूक संपविण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानुसार गतवर्षी कमी वेळेत मिरवणूक संपविली.  या उत्सवात सेवा दिलेले पोलिस, महापालिका अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार!- पुनीत बालन (विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट) 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPuneपुणे