शहरात पाचव्या दिवशी ३६ हजार ६०३ गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:16 IST2021-09-16T04:16:16+5:302021-09-16T04:16:16+5:30
पुणे : कोरोना संसर्ग वाढू नये व गर्दी टाळली जावी, याकरिता महापालिकेने पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमार्फत गणेश विसर्जनासाठी कार्यरत ...

शहरात पाचव्या दिवशी ३६ हजार ६०३ गणेशमूर्तींचे विसर्जन
पुणे : कोरोना संसर्ग वाढू नये व गर्दी टाळली जावी, याकरिता महापालिकेने पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमार्फत गणेश विसर्जनासाठी कार्यरत केलेल्या फिरत्या हौदांमध्ये, पाचव्या दिवशी ३६ हजार ६०३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर २१ हजार ९९३ गणेशमूर्तींचे संकलन केंद्रांवर संकलन झाले आहे.
सध्या गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे ५५, नगरसेवकांच्या माध्यमातून ६४ तर पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ६४ फिरते हौद कार्यरत आहेत. यापैकी पहिल्या दिवशी (दि. १०) ८१ फिरते हौद कार्यरत होते. यादिवशी ३७ श्रींच्या मूर्तींचे या हौदात विसर्जन झाले, तर संकलन केंद्रांवर २२ मूर्ती संकलित झाल्या आहेत.
पाच दिवसातील फिरत्या हौदांमधील शहरातील गणेश विसर्जन व मूर्ती संकलन पुढीलप्रमाणे :
पहिला दिवस (दि. १०) : १५ - २२
दुसरा दिवस (दि. ११ - दीड दिवस) : २ हजार १३२ - २ हजार १७८
तिसरा दिवस (दि. १२) : ५८२ - ५८६
चौथा दिवस (दि. १३) : १८० - ३०६
पाचवा दिवस (दि. १४) : ३६ हजार ६०३ - २१ हजार ९९३
------------------
शहरातील ९९६ निर्माल्य संकलन केद्रांवर गेल्या पाच दिवसात ७० हजार १६३ किलो निर्माल्य जमा झाले आहे तर घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या १ हजार २८३ वाटप केंद्रातून एकूण ४८ हजार ५४४ किलो अमोनियम बायकार्बोनेट नेले असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिली आहे.
पहिल्या पाच दिवसात शहरात एकूण ३९ हजार ५१२ गणेशमूर्तींचे फिरत्या हौदांमध्ये विसर्जन झाले असून, २५ हजार ८५ मूर्तींचे संकलन झाले आहे तर ७० हजार १६३ किलो निर्माल्य जमा झाले आहे.
-----------------------------