शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही :सुनील देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:09 IST

त्रिपुरात भाजपची सत्ता आल्यावर त्याचे श्रेय प्रभारी सुनील देवधर यांना देण्यात आले. निवडणुकीपूर्वी त्रिपुरात नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती स्वतः देवधर यांनी दिली. मात्र आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी निभवायची असून महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देत्रिपुरा भाजपमध्ये पुढचे सहा महिने प्रवेश नाही सध्या पुतळ्यांची नाही माणसांची चिंता करण्याची गरज

पुणे : मला महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही असे वक्तव्य भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की,मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी मोर्च्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी मी फक्त त्रिपुरात बोलायला योग्य आहे.फडणवीस कार्यकुशल मुख्यमंत्री आहे. या संकटाचा मुख्यमंत्री आणि पक्ष म्हणून भाजप योग्य सामना करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्रिपुरात भाजपची सत्ता आली असली तरी पुढील सहा महिने पक्ष प्रवेश बंद असणार असल्याचे धोरण त्यांनी स्पष्ट केले.   

लेनिन पुतळ्याच्या संदर्भात घडलेल्या घटनेवर बोलताना त्यांनी आम्ही त्या घटनेशी अजिबात सहमत नाही.. एखादा मूर्खपणा करतो त्याचे अनुकरण करत अजून चार जण करत असतील तरीही तो मुर्खपणाचं असतो. सध्या पुतळ्यांची चिंता कमी करून जिवंत माणसांची करायची गरज आहे असेही ते मतही त्यांनी मांडले.पुढे ते म्हणाले की, देशातील एकमेव त्रिपुरा राज्यात कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कम्युनिस्टमुक्त भारतची जबाबदारी  दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिपुरात कम्युनिस्ट पक्षाने कधीही प्रामाणिकपणे जिंकलेली नाहीये. त्यांचा पाया अपराध, बेईमानी आहे त्यामुळे त्यांच्याकडून  प्रामाणिक कामाची अपेक्षा चुकीची आहे. यंदाची शंभर टक्के निवडणूक कॅमेऱ्याच्या नियंत्रणात झाली. त्यामुळे ईच्छा असूनही त्यांना काहीही करता आले नाही. 25 वर्ष कम्युनिस्ट सरकार असूनही त्रिपुरात आजही 67 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जगत आहेत.भारतात महिलांवर सर्वाधिक अत्याचार त्रिपुरात आहे. गुन्हे वेगवान आणि तपास संथ परिस्थिती आहे बलात्कार हा तिथे राजकीय सूड घेण्याचा प्रकार आहे. हा प्रकार फक्त कम्युनिस्ट सरकारच्या काळात होत होता असा आरोपही त्यांनी केला . माणिकसरकार ते फक्त निरुपयोगी मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशात 1300 रुपये, खात्यात 2300 रुपये मात्र 40 किलोमीटरसाठी खासगी हेलिकॉप्टर कसे वापरायचे असा सवालही त्यांनी विचारला.

टॅग्स :PuneपुणेTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018BJPभाजपा