पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाहतूक
By Admin | Updated: March 23, 2016 01:04 IST2016-03-23T01:04:12+5:302016-03-23T01:04:12+5:30
पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक येत्या दोन दिवसांत पूर्णपणे

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाहतूक
लोणी काळभोर : पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक येत्या दोन दिवसांत पूर्णपणे न थांबल्यास २५ मार्चपासून सहा आसनी रिक्षाचालक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चिंतामणी सहा आसनी रिक्षा संघाचे अध्यक्ष व पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल झेंडे यांनी पोलीस खात्याला दिला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना झेंडे म्हणाले, की सध्या हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या आणी स्कॅ्रप झालेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहा आसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहनांमध्ये पोलीस व त्यांच्या नातलगांची वाहने असल्याने त्यांना वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद आहे.
सहा आसनी रिक्षाचालकांवर कारण नसताना कारवाई होत असल्याने वाहतुकीचा कायदेशीर परवाना असूनही या सहा आसनी रिक्षाचालकांना व्यवसाय करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.
आज सर्व सहा आसनी रिक्षाचालक निवेदन देण्यासाठी
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात
आले होते. आज त्यांनी रिक्षा
रस्त्यांवर न उतरवता लोणी
काळभोर बाजार मैदानांवर लावल्या होत्या; परंतु हडपसर गाडीतळ
येथून जीप, टाटा मँजिक, मारुती
व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या आणी स्क्रॅप झालेल्या पॅगो रिक्षा तसेच जिल्ह्याबाहेरील सहा आसनी
रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक मात्र विनाव्यत्यय सुरू
होती. प्रवाशांचे विशेषत: महिला, लहान मुले व वृद्धांना प्रवासासाठी पर्याय शोधावा लागल्याने हाल झाले.
(वार्ताहर)
> सध्या रासरोसपणे विनापरवाना होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद व्हावी व सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय मिळावा याकरिता रिक्षा संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, परिवहन विभाग, वाहतूक शाखा हडपसर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना एका निवेदनाद्वारे सदर अवैध प्रवासी वाहतूक २५ मार्चपर्यंत कायमस्वरूपी बंद न झाल्यास सर्व सहा आसनी रिक्षाचालक आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.