अवैध वाळू वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST2021-09-18T04:11:07+5:302021-09-18T04:11:07+5:30

६ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून अवैधरीत्या वाळू ...

Illegal sand transportation | अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक

६ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह वाळू असा ६ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस कर्मचारी विनोद लोखंडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम राजेंद्र आटोळे (रा. शिरवली, ता. बारामती) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार उंडवडी गावच्या हद्दीत ड्रायव्हर ढाब्याजवळ पोलिसांनी हा ट्रक पकडला. त्यात गुणवडी (ता. बारामती) येथून चोरून आणलेली वाळू विकण्यास नेली जात होती. आटोळे याच्याकडे वाळूची कोणतीही पावती आढळून आली नाही. त्याने अवैधरीत्या वाळूचोरी करत वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी पांढरे, वाघमोडे, शेळके, लोखंडे यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Illegal sand transportation