शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणारा सोरतापवाडीत गुन्हे शाखेकडून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 14:06 IST

लायसन्स नसताना बेकायदेशीरपणे १ पिस्तुल व त्यामध्ये १० जिवंत राउंड बाळगून फिरणार्‍या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.

लोणी काळभोर : लक्ष्मीपूजन गुरुवार (१९ आॅक्टोबर) रोजी सोरतापवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने लायसन्स नसताना बेकायदेशीरपणे १ पिस्तुल व त्यामध्ये १० जिवंत राउंड बाळगून फिरणार्‍या एकास जेरबंद केले आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मनोजकुमार अशोक अंकुशे (वय ३२, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यास अटक करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दत्तात्रय जगताप, महेश गायकवाड, निलेश कदम, रवी शिनगारे, पोपट गायकवाड, राजू मोमीन यांचे पथक नुकतीच झालेली कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणूक व दिवाळी सणाचे अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाणेचे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक महेश गायकवाड व निलेश कदम यांना खबºया मार्फत कुंजीरवाडी गावचे पुढे पुणे-सोलापूर रोड लगत सोरतापवाडी गावचे हद्दीत साई आॅटो गॅरेज समोर इसम नामे मनोजकुमार अंकुशे हा आपले जवळ लायसन्स नसताना बेकायदेशीर पणे पिस्तुल बाळगून फिरत आहे, अशी माहिती मिळताच वरील पोलीस पथकाने साई गॅरेज समोर जाऊन पाहिले असता तेथे अंकुशे हा संशयितरित्या उभा असलेला दिसला. पोलिसांना संशय आल्याने तो पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने पाठलाग करुन त्याला जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता पॅण्टच्या मागील बाजूस १ पिस्तूल व त्यामध्ये १० जिवंत राउंड मिळून आले. पिस्टलचे लायसन्सबाबत विचारपूस केली असता स्वत:जवळ लायसन्स नसल्याचे सांगितले.बेकायदेशीर पिस्तुल बाळगले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. पोलीस नाईक महेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस