शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा जमीन हस्तांतर प्रकरण भोवले, मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:15 IST

- निलंबनाच्या काळात भोसले यांच्या मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त सचिव प्रवीण पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत.

पुणे : टाटा पॉवर कंपनीची जमीन बेकायदा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा उद्योग मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या अंगलट आला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने त्यांचे निलंबन केले असून, त्यांनी दिलेले आदेशही रद्द करण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात भोसले यांच्या मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त सचिव प्रवीण पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत.

रणजित भोसले हे मुळशीचे तहसीलदार पदावर कार्यरत असताना ‘दी टाटा पॉवर कंपनी लि.’ या कंपनीचे नाव कमी करून धोंडू गोपाल ढोरे यांच्या मालकी हक्काचे आदेश करून नाव दाखल करून अनियमितता केली. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने २० मार्च रोजी या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला. भोसले यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४९, १५० व १५५ अन्वये दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत.

या अनियमिततेबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या स्तरावर चौकशी करण्यात आली. हा चौकशी अहवाल १२ एप्रिल रोजी राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यामध्ये अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याप्रकरणी ८५ वर्षांपेक्षा अधिक विलंब झाला आहे, हे विचारात न घेता अंतिम निर्णय देण्याची कार्यवाही कायदेशीर नाही. अशा प्रकारे शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याने भोसले यांची विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे.

त्यानुसार भोसले यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे आदेश अतिरिक्त सचिव प्रवीण पाटील यांनी जारी केले आहेत. आदेश अमलात असेपर्यंत भोसले यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय राहील व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. भोसले यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त तहसीलदार जयराज देशमुख यांना प्रभारी कार्यभार दिला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड